Wednesday, July 31, 2024

गुरु ठाकुर यांची कविता, फारच सकारात्मक ..

 गम्मत अशीकी .. ही कविता विंदांच्या नावानी फिरत होती.. 

त्यावतर गुरु ठाकूर म्हणाले .. विंदांचे नाव लागणे / लावावेसे वाटणे ह्यात माझा सन्मान आहे!!! 

The above incidence I read it on the internet/ social media... 

असे जगावे दुनियेमद्ये ,

  आव्हानांचे लावून अत्तर,

नजर रोखून नजरेमध्ये,

  आयुष्याला द्यावे उत्तर,

नको गुलामी नक्षत्रांची   ,

  भीती आंधळी ताऱ्यांची,

आयुष्याला भिडतानाही,

  चैन करावी स्वप्नांची,

अशी दांडगी इच्छा ज्याची,

  मार्ग तयाला मिळती सत्तर,

 नजर रोखून नजरेमध्ये,

  आयुष्याला द्यावे उत्तर.

पाय असावे जमिनीवरती,

  कवेत अंबर घेताना,

हसू असावे ओठांवरती,

  काळीज काढून देताना...

संकटासही ठणकावून सांगावे,

  आता ये बेहत्तर,

नजर रोखून नजरेमध्ये,

  आयुष्याला द्यावे उत्तर.



No comments: